Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी देवल पुरस्कार जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाचा देवल पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना जाहीर झाला आहे. येत्या१३ नोव्हेंबरला नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या जयंती निमित्त सांगलीमध्ये  या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे.

देवल स्मारक संस्थेचे अध्यक्ष शरद बापट यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. ११ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, मानपत्र असं  या पुरस्काराचं स्वरूप आहे. जयंत सावरकर यांनी सुर्यास्त नाटकातुन रंगभूमीवर पदार्पण केलं.

संशयकल्लोळ, शारदा, एकच प्याला, भावबंधन, बेबंदशाहीयांसारख्या नाटकात त्यांनी भूमिका केल्या. मालिका आणि चित्रपटांमध्येही सावरकर यांनी अभिनय केला. जयंत सावरकर हे ९७ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

Exit mobile version