नवी दिल्ली(वृत्तसंस्था): देशभरातली ५८ विमानतळं कृषी उडान योजनेच्या कक्षेत येत असल्याचं, नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्री जनरल वी. के. सिंह यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं. ही योजना कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशानं सुरु केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून अन्य ३३ विमानतळांसह ईशान्य भारत, डोंगराळ प्रदेश आणि आदिवासी भागातल्या २५ विमानतळांवर विशेष लक्ष पुरवलं जात असल्याची माहिती सिंह यांनी दिली. कृषी उत्पादनांची ने-आण सुलभ करण्यासाठी तसंच त्यांची उलाढाल वाढवण्यासाठी विमानतळ प्राधिकरण मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत असल्याचं सिंह यांनी सांगितलं.