नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी नायब तहसीलदारांसह राजपत्रित वर्ग दोन अधिकाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचं असलं तरी या पदाला इतर विभागांमधल्या समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळतं. त्यामुळे ग्रेड पे 4 हजार 300 रुपयांवरुन वाढवून 4 हजार 800 रुपये करण्याची त्यांची मागणी आहे.
सोलापूर जिल्ह्यात सर्व तहसीलदार आणि नायब तहसीलदार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागं न घेण्याचा इशारा तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेचे सुशील बेल्हेकर आणि एस. सी. परदेशीमठ यांनी दिला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
धुळे जिल्ह्यात तहसीलदार आणि नायब तहसीलदारांबरोबर उपजिल्हाधिकारीही आंदोलनात सहभागी झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे महसूलचं काम ठप्प झालं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.