कोल्हापुरातल्या श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापुरातल्या श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली असून जोतिबा डोंगरावर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. जोतिबा यात्रेचा उद्या मुख्य दिवस असून मानाच्या सर्व सासनकाठ्या देखील डोंगरावर दाखल झाल्या आहेत. भाविकांच्या सोयीसाठी नवीन दर्शन मंडपामधून दर्शन व्यवस्था केली आहे. यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे ५ वाजता तहसीलदारांच्या हस्ते अभिषेक होईल. नंतर दुपारी पालकमंत्र्यांच्या हस्ते सासनकाठी सोहळा सुरू होईल. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला ‘श्रीं’चा पालखी सोहळा संध्याकाळी पाच वाजता होणार आहे.