नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमधे 39 निर्वासितांचे मृतदेह वाहून नेणा-या ट्रकच्या चालकाला ब्रिटिश पोलिसांनी अटक केली आहे. 31 पुरुष आणि 8 महिलांचे मृतदेह वाहून नेणारा ट्रक लंडनपासून 40 किलोमीटर अंतरावर ग्रेज औद्योगिक वसाहतीत गेल्या बुधवारी सापडला होता.
ट्रकचा चालक मॉरिस रॉबीन्सन हा उत्तर आयर्लंडमधला 25 वर्षांचा तरुण असून, या तपासादरम्यान झालेली ही पहिलीच अटक आहे. जुलै 2005 मधे लंडनमधे झालेल्या आत्मघातकी बॉम्बहल्ल्यानंतरचं हे पहिलच मोठं हत्याकांड आहे.