Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आषाढी यात्रेच्या अनुषंगाने पालखी महामार्गाची पाहणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पुणे : आषाढी यात्रेच्या अनुषंगाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर चालू असलेल्या प्रकल्पांच्या कामाची पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दरवर्षी जुन महिन्यामध्ये आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व देहू येथून श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे होत असते. पायी आषाढी वारीकरीता महाराष्ट्रातून हजारो वारकरी येत असतात. या वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा देण्याचे काम प्रशासनामार्फत करण्यात येते. वारीचे आयोजन पावसाळ्याच्या सुरुवातीस होत असल्याने वारकऱ्यांसाठी पालखी मार्ग व पालखी तळावर आवश्यक व्यवस्था करण्याच्यादृष्टीने आतापासूनच सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना डॉ.देशमुख यांनी दिल्या आहेत.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या प्रकल्पाची कामे ठिकठिकाणी सुरु आहेत. हवेली, खेड, दौंड-पुरंदर, बारामती-इंदापूर या तालुक्यांच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी आषाढी यात्रा (पायी वारी) 2023 च्या अनुषंगाने आपआपल्या कार्यक्षेत्रातून जाणाऱ्या दोन्हीही पालखी मार्गाच्या पूर्ण झालेल्या आणि प्रगतीपथावर असलेल्या कामांची आळंदी व देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त व इतर सदस्य आणि तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करावी. तसेच आषाढी वारीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने बैठका घेऊन सर्व संबंधीतांना सूचना देण्यात याव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या आहेत.

Exit mobile version