आयुष मंत्रालय येत्या सोमवारी वैज्ञानिक परिषदेचं आयोजन करणार
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त आयुष मंत्रालय येत्या सोमवारी नवी दिल्लीत एका वैज्ञानिक परिषदेचं आयोजन करणार आहे. ‘होमिओपरिवार-सर्वजन स्वास्थ्य, एक आरोग्य,एक कुटुंब’ ही परिषदेची संकल्पना आहे. होमिओपॅथीचे जनक डॉक्टर ख्रिस्तियन फ्रेडरिक सॅम्युएल हॅनेमन यांच्या जयंतीनिमित्त जागतिक होमिओपॅथी दिन साजरा केला जातो.
या परिषदेत धोरणात्मक मुद्दे, होमिओपॅथीचा प्रसार, संशोधन आणि होमिओपॅथी चिकित्सा या विषयांवर विविध सत्र आयोजित केली जाणार आहेत. यावेळी, होमिओपॅथीच्या भविष्यकालीन वाटचालीविषयी परिसंवादांचं आयोजनही केलं जाणार आहे.