कोविड चाचण्यात वाढ करण्याचे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड रूग्णांच्या संख्येत वाढ दिसत असल्यानं कोणत्याही प्रकारे गाफील न राहता कोविड चाचण्यात वाढ करण्याचे निर्देश, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. महानगरपालिकेच्या वाशी, ऐरोली, नेरूळ इथल्या तिन्ही सार्वजनिक रूग्णालयांच्या ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह रूग्णांसाठी एकूण पन्नास खाटांची सुविधा, कोविड रुग्णांवरील उपचार करण्यासाठी सध्या सुरू आहे. याशिवाय सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी इथल्या अतिदक्षता विभाग सुविधेतील ७५ खाटा सर्व अत्यावश्यक सुविधांनी सज्ज असल्याची पडताळणी करून घ्यावी. तसंच आवश्यकता भासल्यास ते तत्परतेनं सुरू करण्याच्या दृष्टीनं सज्ज राहायला आयुक्तांनी सांगितलं. तसंच कोविड रुग्णांच्या मार्गदर्शनासाठी पूर्वीप्रमाणे कोव्हीड वॉर रूम पुन्हा सुरू करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.