Site icon साप्ताहिक एकच ध्येय

फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज-चिराग शेट्टी जोडीला उपविजेतेपद

मुंबई (वृत्तसंस्था) : पॅरिस इथं झालेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज-चिराग शेट्टी या जोडीला पुरुष दुहेरीच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. अंतिम फेरीच्या सामन्यात त्यांना इंडोनेशियाच्या मार्कस गिडे ऑन आणि केव्हीन साकामुल्जो या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या जोडीनं, २१-१८, २१-१६ असं नमवलं.

याआधी या अग्रमानांकित जोडीविरुद्ध खेळलेले सहाही सामने, सात्विक-चिराग जोडीनं गमावले होते. यावर्षीच्या हंगामात या भारतीय जोडीनं दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती.

ऑगस्टमध्ये त्यांनी थायलंड सुपर सिरीज ७५० खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. फ्रेंच बॅडमिंटन विजेतेपद ही जिंकलं‌ असतं, तर त्यांच्या बॅडमिंटन कारकिर्दीतला हा सगळ्यात मोठा विजय आणि मोठं विजेतेपद ठरलं असतं.

Exit mobile version