स्मार्ट प्रकल्पांतर्गत ५४१ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रकल्प अहवालांना मंजुरी
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्पांतर्गत ५४१ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालांना मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे प्रमुख दशरथ तांभाळे यांनी दिली आहे. अन्य ६५९ शेतकरी उत्पादक कंपन्यांना उप-प्रकल्प उभारणीसाठी प्राथमिक मान्यता देण्यात आल्याची माहिती तांभाळे यांनी दिली. स्मार्ट प्रकल्पाला जागतिक बँकेचं अर्थसहाय्य मिळत असून हा प्रकल्प मुख्यतः कृषि विभाग आणि अन्य संलग्न विभागामार्फत राबवण्यात येतो. या प्रकल्पाच्या अंतर्गत गोदाम, शीतगृह, अवजार बँका, प्रक्रिया उद्योग यासारख्या पायाभूत सुविधा शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत उभ्या केल्या जाणार आहेत. आत्तापर्यंत सुमारे २०० शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदानाच्या पहिल्या हप्त्यापोटी एकंदर ११७ कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत.