नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या उष्णतेची लाट सर्वत्र पसरली आहे. त्याचा दाह हा प्रमाणापेक्षा अधिक आहे. आणि त्यामुळेचं उष्माघात होऊन अनेक लोकही मृत्यूमुखी पडत आहेत. असाचं धोका संभवतो तो म्हणजे व्हॉटसअप फेसबुकवर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून व्हायरल होणाऱ्या एका परिपत्रकामुळं ज्यात दावा केला आहे की, ग्राहकांनी त्यांच्या वाहनांच्या इंधन टाक्या जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत भरू नयेत कारण त्यांचा स्फोट होऊ शकतो. वाढत्या तापमानामुळे असं होऊ शकत असं त्यात नमूद आहे.
याविषयी इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं सांगितलं की, आम्ही असे कोणतेही परिपत्रक जारी केलेले नाही. तसंच ही एक फेक न्यूज आहे. त्यामुळे कोणीही यावर विश्वास ठेवू नये. आम्ही सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर अनेकदा याविशयी स्पष्टीकरणही दिलेलं आहे. तसंच आम्ही एका ऑटोमोबाईल अभियंत्याशी देखील बोललो ज्यांनी स्पष्ट केलं की, बाह्य घटकांशिवाय स्वतःहून आग लागून स्फोट होणं शक्य नाही.