Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पुरातन काळात, भारतातुन विदेशात नेण्यात आलेल्या वस्तु, मूर्ती परदेशातून परत आणण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पुनरुच्चार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पुरातन काळात, भारतातुन विदेशात नेण्यात आलेल्या वस्तु, मूर्ती  परदेशातून  परत आणण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना त्यांनी हे सांगितलं की, १४व्या-१५व्या शतकातील चोल कालखंडातील अरियालूर जिल्ह्यातील विष्णू मंदिरातून चोरीला गेलेली भगवान हनुमानाची धातूची मूर्ती सुपूर्द करण्यात आली.

ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावासानं ही मूर्ती गेल्या आठवड्यात तामिळनाडू सरकारकडे सुपूर्द केली. आजपर्यंत विविध देशांमधून 251 पुरातन वस्तू परत मिळवण्यात आल्या आहेत, त्यापैकी 2014 पासून 238 वस्तू परत आणल्या गेल्या असल्याचं रेड्डी सांगितलं.

Exit mobile version