Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था ही देशाच्या सर्वंकष विकासात महत्वाची भागीदार संस्था आहे – राष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाच्या अन्न आणि पोषण सुरक्षा या बाबतीत दुग्ध व्यवसाय महत्त्वाची भूमिका बजावतो तसंच देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 5 टक्के वाटा  दुग्ध व्यवसायाचा आहे. त्यामुळे राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था ही देशाच्या सर्वंकष विकासात महत्वाची भागीदार संस्था आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं.

त्या  हरणायातल्या कर्नाल इथं भारतीय कृषी संशोधन परिषद – राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेच्या 19 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करत होत्या. संस्थेनं अधिक दूध देणाऱ्या म्हशी आणि गायींचे क्लोन तयार करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. भारतातल्या  डेअरी उद्योगाच्या व्यवस्थापनात महिला महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. महिलांना शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य विकासात अधिक संधी तसंच दुग्धव्यवसाय क्षेत्रात उद्योग उभारण्यासाठी सुलभ कर्ज आणि बाजारपेठही उपलब्ध करून दिली पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं.

Exit mobile version