Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लहान दुकानदार किंवा व्यावसायिकांचं नुकसान न करता ई कॉमर्स व्यवहार रुजवण्याची आवश्यकता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लहान दुकानदार किंवा व्यावसायिकांचं नुकसान न करता ई कॉमर्स व्यवहार रुजवण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी म्हटलं आहे. डिजिटल व्यवहारांसाठी खुलं नेटवर्क या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्धाटन आज नवी दिल्ली इथ गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ई कॉमर्स क्षेत्रात तंत्रज्ञानात पुढे गेलेल्या कंपन्यांचा दबदबा असून, छोट्या व्यापाऱ्यांसांठी हे आव्हान बनत चाललं आहे, असं ते म्हणाले. ई कॉमर्स चा किरकोळ व्यापारातला हिस्सा केवळ ३ ते ४ टक्के असला, तरी या संदर्भात धोरण ठरवताना या अडचणींचा विचार केला पाहिजे, असं ते म्हणाले.

Exit mobile version