बनावट ना हरकत प्रमाणपत्राआधारे सुरू असलेल्या १७७ शाळा कायमस्वरूपी बंद
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): बनावट ना हरकत प्रमाणपत्राआधारे राज्यात सुरू असलेल्या ८०० हून अधिक शाळांपैकी १७७ शाळा कायमस्वरूपी बंद कऱण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या आठवडाभरात राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालयांनी आपापल्या विभागातील सर्व शाळांची कागदपत्रे तपासून त्यांच्या वैधतेविषयीचा अहवाल सादर करण्याचे आदेश पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयातून देण्यात आले आहेत.