नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्जेन्टिनामध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात डाव्या पक्षाचे उमेदवार अलबर्टो फर्नांडिज यांनी विजय मिळवला आहे. यामुळे विद्यमान राष्ट्रपती मॉरिसियो मैक्री यांचा संकटांनी घेरलेला शासनकाळ समाप्त झाला आहे.
६० वर्षीय फर्नांडिज कायद्याचे प्राध्यापक आहेत. एकूण ४७ पूर्णांक ३६ शतांश टक्के मतं मिळाल्यामुळे त्यांना स्पष्ट विजय मिळवला. फर्नांडिज यांच्या विजयामुळे माजी राष्ट्रपती ख्रिस्तिना किरचेर पुन्हा राजकारणात सक्रिय होऊन त्या उपराष्ट्रपती होतील.