मुंबई (वृत्तसंस्था) : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात येणार्या प्रस्तावित सदनिका विक्री सोडतीसाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवरूनच अर्ज नोंदणीकरण करून सोडत प्रक्रियेमधे सहभागी व्हावं असं आवाहन म्हाडाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केलं आहे.
याव्यतिरिक्त कोणत्याही समाज माध्यमांची, त्रयस्थांची, संस्थांची किंवा इतर मध्यस्थांची मदत ‘म्हाडा’तर्फे घेण्यात आलेली नाही असं त्यांनी सांगितलं. काही समाजमाध्यमं नागरिकांना विशिष्ट लिंक पाठवून क्लिक करण्याबाबत सूचित करीत असल्याचंही निदर्शनाला आलं आहे.अशाप्रकारे प्राप्त झालेल्या व्हाट्सअॅप ग्रुप्स अथवा संकेत स्थळावर जोडण्यासाठी प्राप्त झालेल्या लिंकवर सहभाग घेऊ नये, कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये तसंच कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये अशी सूचना त्यांनी केली आहे.