राज ठाकरे यांच्या हस्ते झालं पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचं उद्घाटन
Ekach Dheya
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचं उद्घाटन काल व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झालं.जागतिक व्यंगचित्र दिनाचं औचित्य साधून युवा संवाद सामाजिक संस्था आणि कार्टुनिस्ट कम्बाईन संस्थेनं हे व्यंगचित्र प्रदर्शन आयोजित केलं आहे. येत्या 7 मे पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे. उद्घाटन समारंभात राज ठाकरे यांनी कोऱ्या कॅनव्हासवर अवघ्या काही मिनिटांमध्ये व्यंगचित्र साकारून या कलेवर असलेली आपली हुकूमत दाखवली.
माझी व्यंगचित्रं बऱ्याचदा भाषणातूनच बाहेर पडतात, अशी मार्मिक टिप्पणी यावेळी ठाकरे यांनी केली… मी व्यंग चित्र पाहात होतो,फार अप्रतिम व्यंगचित्र आहेत.मला असे व्यंग चित्र पाहताना रोज माझे हात असे शिवशिवतात ,पण मला व्यंग चित्रासाठी ज्या प्रकारची बैठक हवी आहे ज्या प्रकारची शांतता हवी आहेत. ती मिळत नाही त्यामुळे मला वेळ मिळत नाही काढायला पण मला असं वाटत की ही व्यंगचित्र माझ्या भाषणातून बाहेर पडतात, त्यामुळे ती तुमच्या पर्यंत पोहचतात. त्यादिवशी मला कोणीतरी प्रश्न विचारला राजकारण की व्यंगचित्र तर मी व्यंग चित्र असं त्यांना सांगितलं तर मी व्यंगचित्रात रमणारा माणूस आहे, चित्रात रमणारा माणूस आहे. कारण कला तुम्हाला जे दाखवू शकते ते विलक्षण असतं. आणि आत्ता ज्या प्रकारची चित्र लागली आहेत.परदेशी लोकांची जी चित्र लागली आहेत, तर त्या आज फक्त शुभेच्छा देण्यासाठी मी इथं आलो आहे.