नीट परीक्षेवेळी चुकीच्या पद्धतीनं तपासणी केल्याच्या घटनांची राज्य महिला आयोगानं घेतली दखल
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): देशभरात एकाच वेळी झालेल्या नीट परीक्षेवेळी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची अत्यंत चुकीची तपासणी केल्याच्या घटनांची राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे. सांगलीत विद्यार्थिनीची चुकीच्या पद्धतीनं तपासणी झाल्याप्रकरणी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांना अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. परीक्षेच्यावेळी कॉपी होऊ नये म्हणून काळजी घेत असताना विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होईल अशी तपासणी अतिशय चुकीची आहे. अशी तपासणी करण्याच्या सूचना कोणी दिल्या? असे अधिकार त्या अधिकाऱ्यांना आहेत का? याची सखोल चौकशी होणं आवश्यक असून याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागानं संपूर्ण राज्यभरातल्या अशा प्रकारांची चौकशी करावी असंही राज्य महिला आयोगानं म्हटलं आहे.