इम्रान खान यांची इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून जामीनावर मुक्तता
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन राज्य सरकारनं मागे घेतलं आहे. राज्याच्या गृह विभागानं राज्यपालांच्या परवानगीनं परवा यासंदर्भातले आदेश जारी केले. निलंबनाचा दिवस २ डिसेंबर २०२१ पासून सेवानिवृत्तीचा दिवस ३० जून २०२२ या कालावधीत ते सेवेवर होते असं गृहित धरण्याचं या आदेशात नमूद आहे. त्यामुळं त्यांना सेवानिवृत्ती आणि इतर लाभ मिळण्यात काहीही अडचणी येणार नाहीत. त्यांच्या विरोधात सेवानियमांनुसार दाखल करण्यात आलेलं आरोपपत्रही सरकारनं मागे घेतले असून हे प्रकरण बंद करत असल्याचं दुसऱ्या आदेशात म्हटलं आहे.