Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महिला यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक वाहतूक बसमध्ये मार्शल नियुक्त करण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला यात्रेकरूंच्या सुरक्षे करीता दिल्लीतल्या सर्व सार्वजनिक वाहतूक बस मध्ये मार्शल नियुक्त करण्याचा निर्णय दिल्ली सरकारनं घेतला आहे. मार्शलच्या प्रशिक्षण शिबिरात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली.

महिलांची सुरक्षितता ही दिल्ली सरकारची प्राथमिकता आहे, असंही ते म्हणाले. सध्या ३ हजार ४०० बस मार्शल कार्यरत आहेत, ही संख्या वाढवून १३ हजार केली जाणार आहे. हिंसा आणि मुलींची छेडछाड रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं, केजरीवाल यांनी सांगितलं.

भाऊबीजच्या दिवशी सर्व महिलांना मोफत प्रवासाची घोषणा देखील केजरीवाल यांनी केली.

Exit mobile version