केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याची संजय राऊत यांची टीका
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडीकडून चौकशी होत आहे, त्या पार्श्वभूमीवर राऊत आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. २०२४ या वर्षी ईडीच्या कार्यालयात कोणाला पाठवायचं याची यादी आम्ही लवकरच तयार करु, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.