दोन हजार रुपयांच्या नोटा आजपासून बँकेतून बदलून घेता येणार
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): देशभरात बँकांनी आजपासून २ हजार रुपयांच्या चलनी नोटा स्वीकारायला सुरुवात केली आहे. बँकांनी बदलून दिलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांची संख्या, रक्कम तसंच या चलनाद्वारे बँकेत जमा केलेल्या रकमेचा दैनंदिन ताळेबंद ठेवावे असे आदेश बँकाना रिझर्व बँकेने काल जारी केलेल्या एका पत्रकात दिले आहेत. या नोटा नेहमीच्याच सर्वसामान्य पद्धतीने बदलता येतील असं रिझर्व बँकेनं म्हटलं आहे. केंद्र सरकारने २०१६ मध्ये निश्चलनीकरणाद्वारे ५०० आणि 1हजार च्या जुन्या नोटा चलनातून काढल्या, त्यावेळी चलनाची गरज भागवण्यासाठी २ हजारची नोट चलनात आणली होती.