साई रिसॉर्ट प्रकरणी आपल्यावर खोटे आरोप केल्याचं अनिल परब यांचं स्पष्टीकरण
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली इथल्या साई रिसॉर्ट प्रकरणी आपल्यावर खोटे आरोप केल्याचं, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमिदारांशी बोलत होते. याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आणखी दोन गुन्हे दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. हे गुन्हे खोटे असून, याप्रकरणी आपली नाहक बदनामी होत आहे, आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माफी मागावी, असं परब यांनी म्हटलं आहे.