Site icon साप्ताहिक एकच ध्येय

50 व्या ‘इफ्फी’ मध्ये ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे प्रदर्शन

नवी दिल्ली : ‘इफ्फी’ म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा 50 वे वर्ष आहे, यानिमित्त गोवा इथं 20-28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेल्या चित्रपट महोत्सवामध्ये अकादमी विजेते म्हणजेच ऑस्कर पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. या चित्रपट महोत्सवामध्ये ‘ऑस्कर रिट्रोस्पेक्टिव्ह’ या शीर्षकाचे एक स्वतंत्र दालन असणार आहे.

या दालनामध्ये मिशेल कर्टिज यांचा ‘कॅसाब्लांका’, व्हिक्टर फ्लेमिंग, बेन हर यांचा ‘गॉन विथ द विंड’, विल्यम वायलर यांचा ‘द बेस्ट इअर्स ऑफ अवर लाइव्हज्’, जोसेफ एल. मॅनकीविक्झ यांचा ‘ऑल अबाऊट इव्ह’, डेव्हिड लीन यांचा ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’, रॉबर्ट वाइज यांचा ‘द साउंड ऑफ म्युझिक’, फ्रान्सीस फोर्ड कोपोला यांचा ‘गॉडफादर’, जोनाथन डेम यांचा ‘द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स’ आणि रॉबर्ट जेमेकिस यांचा ‘फॉरेस्ट गम्प’ या सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

या सर्व चित्रपटांना ऑस्कर स्पर्धेत कोणत्या ना कोणत्या विभागात नॉमिनेशन मिळालेले आहे, तसेच पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. विशेष म्हणजे यापैकी काही चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरले तर बहुतेक चित्रपट हे हॉलिवूड क्लासिक मानले जातात. असे दुर्मिळ पुरस्कारप्राप्त चित्रपट पाहण्याची संधी यंदाच्या 50 व्या ‘इफ्फी’मध्ये चित्रपट रसिकांना मिळणार आहे.

Exit mobile version