Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सचिन तेंडुलकर यांनी राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत म्हणून केला करार

मुंबई (वृत्तसंस्था) : जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत म्हणून करार केला असून त्यांच्या आवाहनाला तरुणांसह सर्व स्तरातील नागरिकांमध्ये जनजागृती होवून अभियान अधिक यशस्वी होण्यास मदत होईल, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने स्वच्छ मुख अभियानासाठी सदिच्छादूत सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रम आज मुंबईत झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य मंत्री गिरीश महाजन, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version