निवृत्तीनाथ महाराज पालखीचा पहिला रिंगण सोहळा सिन्नर तालुक्यातल्या दातली इथं पार संपन्न
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा पहिला रिंगण सोहळा सिन्नर तालुक्यातल्या दातली इथं आज पार पडला. नाशिक जिल्ह्यात झालेला रिंगण सोहळ्यासाठी वारकऱ्यांसह सुमारे ३० ते ३५ हजार भाविक सहभागी झाले. त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचा काल रात्री लोणारवाडी इथं मुक्काम झाला. त्यानंतर आज सकाळी सिन्नर शहरात पायी दिंडी सोहळ्याचे आगमन झाले. दुपारी दातली शिवारात रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.