देशात महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी ३०० वनस्टॉप केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): देशात महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी ३०० वनस्टॉप केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या वनस्टॉप केंद्रात हिंसेशी संबंधित प्रकरणात महिलांना उपचारात मदत, कायदेशीर सहकार्य, इतर मार्गदर्शन आणि तात्पुरता आसरा देण्याची सोय आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना इराणी म्हणाल्या:‘‘प्रधानमंत्रीजी ने आदेश दिया की देश के हर जिले मे महिला संरक्षण के लिये वन स्टॉप सेंटर बने। आठ सौ एक सेंटर्स भारत सरकार ने अप्रुव्ह किये। वर्तमान मे सात सौ पैंतीस सेंटर्स देश मे फंक्शनल है। प्रदेशो से मांग आई की जहां जहां जिस जिले की आबादी ज्यादा है या जहां पर महिला के खिलाफ वारदातें ज्यादा है वहां पर वन स्टॉप सेंटर की संख्या बढाई जायें। तो अब तीन सौ और सेंटर्स खोलने का बजट भारत सरकार ने सुनिश्चित कर दिया है।’’ गेल्या नऊ वर्षात केंद्र सरकारने महिलांसाठी केलेल्या विविध योजनांची माहितीही इराणी यांनी यावेळी दिली. देशात ३४ हून अधिक महिला हेल्पलाईन कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. अंगणवाड्यांमध्येही अनेक सुधारणा करण्यात आल्या असून, तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचं त्या म्हणाल्या. अंगणवाड्यांमध्ये पोषण ट्रॅकर बसवण्यात आले असून, या माध्यमातून सहा कोटीहून अधिक मुलांची माहिती संकलित झाल्याचं त्यांनी सांगितलं. देशात तीन कोटी ३२ लाख महिलांनी प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती इराणी यांनी दिली.