Site icon साप्ताहिक एकच ध्येय

उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा तोंड देण्यासाठी ताबडतोब उपाय योजना सुरु करण्याच्या डॉ. मनसुख मांडवीय यांच्या सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उष्णतेच्या लाटेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी राज्यांनी ताबडतोब उपाय योजना सुरु कराव्यात, अशा सूचना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी दिल्या आहेत. उष्णतेच्या लाटेनं बाधित सात  राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आज झाली, त्यात ते बोलत होते.उष्माघाताच्या सूचना  लोकांना वेळोवेळी द्याव्यात आणि विपरीत परिणाम रोखण्यासाठी जय्यत तयारीत असावं असं ते म्हणाले.

तीव्र उष्माघातासह कोणत्याही आपत्तीशी मुकाबला करण्यासाठी राज्यांचे आणि केंद्राचे एकत्रित प्रयत्न कसे महत्वाचे ठरतात,यावर त्यांनी भर दिला. आरोग्य मंत्रालयाची पाच सदस्यीय समिती, हवामान विभाग आणि राष्ट्रीय .आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी उष्णतेच्या लाटेनं प्रभावित राज्यांची पाहणी करणार आहेत. सध्या, ओडिशा, छत्तीसगढ,पश्चिम बंगाल,तेलंगणा,बिहार आणि झारखंड या राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली आहे.

Exit mobile version