भारतीय अर्थव्यवस्थेत जीडीपी वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात ६ पूर्णांक ३ दशांश टक्के राहील
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): भारतीय अर्थव्यवस्थेत जीडीपी वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात ६ पूर्णांक ३ दशांश टक्के राहील असा अंदाज फिच पतमानांकन संस्थेनं वर्तवला आहे. फिच नं याआधी हा दर ६ टक्के राहील असा अंदाज दिला होता. जानेवारी ते मार्च २०२३ या काळात कारखानदारी आणि बांधकाम क्षेत्राची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाल्यामुळे हा सुधारित अंदाज वर्तवल्याचं फिच ने म्हटलं आहे. २०२४-२५ आणि२०२५-२६ या आगामी दोन वर्षांमधे भारताचा आर्थिक वाढीचा दर साडेसहा टक्के राहील, असा फिच चा अंदाज आहे.