समाज कल्याण विभागातर्फे सामाजिक न्याय दिनानिमित्त समता रॅलीचे आयोजन
Ekach Dheya
पुणे : राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या १४९ व्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने सोमवारी नशामुक्त भारत प्रबोधन समता रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात समाज कल्याण विभागाचे उपायुक्त रविंद्र कदम पाटील, सहायक आयुक्त कैलास आढे, सहायक आयुक्त हरिश डोंगरे, ह.भ.प. स्नेहल जाधव पायगुडे, विश्वास बनसोडे, हरीजी डोंगरे, श्री शाहू महाविद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेवेचे विद्यार्थी, कर्वे संस्था व पी.व्ही.जी. महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी ह.भ.प. श्रीमती पायगुडे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर पोवाडा गायला. श्री. बनसोडे यांनी स्वरचित बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे व संत कबीर यांच्या कार्यावर प्रेरणादायी गीते सादर केली.
राजीव गांधी ई लर्निंग स्कूल ते पर्वती येथील श्री शाहू मंदिर महाविद्यालय पर्यंत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कर्वे समाज सेवा संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देश नशामुक्त करण्यासाठी शहरातील चौकांत जन प्रबोधन करुन सामाजिक परिवर्तनाची गीते सादर केली. श्री. डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना व नागरिकांना नशामुक्त भारत अभियानांतर्गत शपथ देऊन स्वतःपासून याची सुरुवात करण्याचे आवाहन केले.