Site icon साप्ताहिक एकच ध्येय

क्वाकरेली सिमोंड्स जागतिक विद्यापीठ मानांकनात आयआयटी मुंबईला देशात पहिला क्रमांक

मुंबई (वृत्तसंस्था) : क्वाकरेली सिमोंड्स जागतिक विद्यापीठ मानांकनात आयआयटी मुंबईनं जगात ‘एकशे एकोणपन्नासावा’ तर देशात ‘पहिला क्रमांक’ मिळवला आहे. गेल्या वर्षी आयआयटी मुंबईला जगात १७२ वा क्रमांक मिळाला होता. आयआयटी मुंबईचे संचालक प्राध्यापक शुभाशीष चौधरी यांनी सांगितलं की, उत्कृष्ट अध्यापन हेच आयआयटी मुंबईचं उद्दिष्ट असून जागतिक मानांकनातलं स्थान हे त्याच्या सोबतीनं आपसूक आलेलं यश आहे.

यंदाच्या मानांकन यादीत पहिल्या २०० शैक्षणिक संस्थांमधे आयआयटी दिल्लीचाही समावेश आहे. आयआयटी दिल्ली १९७ व्या स्थानावर आहे. यंदा या मानांकन यादीत भारतातल्या एकूण ४५ शैक्षणिक संस्थांना मानांकन मिळालं आहे. आयआयटी मुंबईच्या यशाबद्दल केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आनंद व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षात शिक्षणाचा दर्जा उंचावला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version