शेतकऱ्यांसाठी तीन लाख ७० हजार कोटी रुपयांची आर्थिक प्रोत्साहन योजना केंद्र सरकारकडून जाहीर
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी सुमारे तीन लाख ७० हजार कोटी रुपयांची आर्थिक प्रोत्साहन योजना काल जाहीर केली. या अंतर्गत युरियाची ४५ किलोची गोणी शेतकऱ्यांना २४२ रुपयालाच मिळेल. युरिया सबसिडीसाठी सरकारनं २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी, तीन लाख ६८ हजार कोटी रुपये राखून ठेवले आहेत. येत्या दोन वर्षात नॅनो युरियाच्या ४४ कोटी बाटल्यांची निर्मिती करणाऱ्या आठ प्रकल्पांमधून उत्पादन सुरू होईल, असं केंद्रीय रसायन आणि खत मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं.