पाकिस्तानला ३ अब्ज डॉलर्सचा कर्ज पुरवठा कऱण्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं दिली मान्यता
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला ३ अब्ज डॉलर्सचा कर्ज पुरवठा कऱण्याला प्राथमिक मान्यता दिली आहे. जुलैमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बोर्डाच्या बैठकीमध्ये या कराराला मंजूरी दिली जाईल. सध्या पाकिस्तान कर्जफेडीसाठी आर्थिक परिस्थतीचा सामना करत असून परकीय चलनसाठा कमी होत असल्यानं देश चिंतित आहे. पाकिस्तानला २०१९ मध्ये मान्य केलेल्या साडेसहा अब्ज डॉलर्सच्या मदत पॅकेजपैकी राहिलेल्या अडीच अब्ज डॉलर्स कर्जाची पाकिस्तान वाट पाहत होता.