Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारत -अमेरिका नौदलाचा बचाव आणि स्फोटके निकामी करण्यासंदर्भात “सॅल्वेक्स” कवायती

नवी दिल्ली : भारतीय नौदल आणि अमेरिकी नौदलाच्या सातव्या  बचाव आणि स्फोटके निकामी करण्यासंदर्भातील “सॅल्वेक्स” कवायती पार पडल्या. कोची येथे 26 जून ते 06 जुलै 23 दरम्यान याचे आयोजन करण्यात आले होते. भारत आणि अमेरिका 2005 पासून या संयुक्त सरावांमध्ये सहभागी होत आहेत. या सरावात तज्ज्ञ पाणबुडे आणि स्फोटके निकामी करणाऱ्या पथकां व्यतिरिक्त आयएनएस निरिक्षक आणि युएसएनएस सॅल्वोर ही जहाजे समाविष्ट असलेल्या दोन्ही नौदलांचा सहभाग होता.

या संयुक्त कवायती 10 दिवसांहून अधिक काळ चालल्या. यात दोन्ही देशांच्या पाणबुडे पथकांनी सागरी बचावाचे अनुभव सामायिक केले आणि जमिनीवर तसेच समुद्रावरील स्फोटके निकामी करण्याच्या कारवाईचे विविध पैलूंसह एकत्र प्रशिक्षण घेतले.  “सॅल्वेक्स”ने आंतर कार्यान्वयन, एकसंधता वाढवण्यासाठी आणि सागरी बचाव आणि स्फोटके निकामी करण्यासंदर्भातील सर्वोत्तम पद्धतींमधून लाभ मिळवण्यासाठी संयुक्त प्रशिक्षण सरावाचेही आयोजन केले.

बंकरांचा शोध, स्फोटके निकामी करणे, समुद्रात बुडालेले जहाज आणि बचाव कार्य आदीं बाबत कार्यान्वयनातील कौशल्य उंचावण्यासाठी उभय देशांच्या पथकांनी एकत्र सराव केला.

Exit mobile version