Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या मदतीसंदर्भात पालकमंत्री दीपक केसरकरांनी केली सचिवांशी चर्चा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबरमधील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या व दुकानाच्या नुकसानीच्या मदतीसंदर्भात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिवांबरोबर चर्चा केली. येत्या चार दिवसात मदत वाटपाचे आदेश निर्गमित करण्यात येतील, असे विभागाच्या सचिवांनी यावेळी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक शेतीचे व दुकानांचे नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत देण्यासंदर्भात श्री. केसरकर यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर व इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे सचिवांनी यावेळी सांगितले.

तसेच आपत्तीमुळे बाधित झालेल्या झोळंबे आणि शिरशिंगी या गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने मागविण्यात आला असून प्रस्ताव प्राप्त होताच, पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव श्री. निंबाळकर यांनी सांगितले.

Exit mobile version