सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर २५ कोटी रुपये मूल्याचं सोनं जप्त
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): महसूल गुप्तचर संचालनालयानं अंदाजे २५ कोटी रुपये मूल्याचं सोनं सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन तीन प्रवाशांकडून जप्त केलं. हे प्रवासी शारजाहून आले होते. यासंदर्भात आत्तापर्यंत चार जणांना अटक केली आहे. या प्रवाशांच्या सामानातून पाच काळ्या पट्ट्यांमध्ये लपवलेल्या पाकिटांमधुन पेस्ट स्वरूपात ४३ किलो ५ ग्रॅम सोनं सापडलं. अधिक तपासानंतर पेस्ट स्वरूपात आणखी ४ किलो ६७ ग्रॅम सोनं स्वच्छतागृहातून जप्त करण्यात आलं, सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीचं रॅकेट कार्यरत असल्याचा संशय डीआरआयने व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे.