वंदे भारतसह सर्व गाड्यांच्या वातानुकूलित प्रवास भाड्यात २५ टक्के कपात
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): रेल्वे मंडळानं सर्व रेल्वे गाड्यांच्या एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासच्या भाडेशुल्कात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. ही कपात त्वरीत लागू होणार असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.
वातानुकूलित तसंच वंदे भारतसह सर्व गाड्यांना हे सवलतीचे दर लागू होणार आहेत. वातानुकुलीत डबे असलेल्या गाड्यांमध्ये सवलतीच्या दराची योजना लागू करण्याचे अधिकार विभागीय रेल्वेला देण्यात आले आहेत. आरक्षण शुल्क, जलद गति अधिभार, जीएसटी, यासारखं इतर शुल्क स्वतंत्रपणे आकारलं जाणार आहे.
या योजनेपूर्वी आरक्षित केलेल्या तिकीटांवर मात्र कोणताही परतावा दिला जाणार नाही तसंच ही योजना विशेष रेल्वे गाड्यांवर लागू होणार नाही, असं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.