जी २० देशांच्या गुन्हेगारी आणि सुरक्षाविषयक कार्यकारी गटाची बैठक गुरुग्राम इथं सुरु
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): जी२० देशांच्या गुन्हेगारी आणि सुरक्षा विषयक कार्यगटाची बैठक आजपासून हरियाणात गुरुग्राम इथं सुरु झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठकीचं उद्घाटन केलं. एनएफटी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मेटावर्सच्या जमान्यात सुरक्षा, ही बैठकीची संकल्पना आहे. तंत्रज्ञानाच्या विकास आणि प्रचारामुळे गुन्हेगारीचं स्वरुप बदललं असून, त्यानुसार सरकारी यंत्रणांनाही अद्ययावत रहावं लागेल, असं शाह आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले. सायबर सुरक्षेविषयी चर्चा करणारी जी २० देशांच्या प्रतिनिधींची ही पहिली बैठक असून आंतरराष्ट्रीय स्तरावर एकजुटीनेच या गुन्हेगारीचा सामना करावा लागेल, असं आवाहन त्यांनी केलं. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत नऊशेहून जास्त प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.