सोन्याच्या काही दागिन्यांच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): केंद्र सरकार ने सोन्याच्या काही दागिन्यांच्या आयातीवर निर्बंध लावले आहेत. एका अधिसूचनेद्वारे परराष्ट्र व्यापार संचालनालयाने सोन्याच्या दागिन्यांना मुक्त व्यापार श्रेणीतुन हलवुन त्यांचा प्रतिबंध श्रेणीत समावेश केला आहे. म्हणजेच आता या वस्तूंची आयात करण्यासाठी सरकारकडून परवाना घेणे आवश्यक असणार आहे. परंतु, भारत-UAE सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराअंतर्गत, आयात केलेल्या वस्तूंसाठी कोणत्याही परवान्याची गरज भासणार नाही आणि या कराराअंतर्गत आयात परवान्याशिवाय सोन्याचे दागिने आणि सोन्यापासून बनवलेल्या वस्तू देशात आणल्या जाऊ शकतात. केवळ संयुक्त अरब अमिरातींबरोबर झालेल्या विशेष करारामुळे तिथून आयातीसाठी परवान्याची आवश्यकता नाही.