Site icon साप्ताहिक एकच ध्येय

परभणी जिल्ह्यातल्या प्राचीन वारशाचं संवर्धन होणं आवश्यक – जिल्हाधिकारी आंचल गोयल

मुंबई : परभणी जिल्ह्यातला प्राचीन वारसा हा अभ्यासक, इतिहासप्रेमी आणि संशोधकांसाठी एक समृद्ध भांडार असून, याचं संवर्धन होण्याची आवश्यकता, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या, ‘परभणी जिल्हा: प्राचीन ऐतिहासिक वारसा’, या ग्रंथाचं काल मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या.

जिल्ह्यातल्या ५५ गावात केलेल्या सर्वेक्षणातून, १३० प्राचीन मंदिरं, ४९२ प्राचीन शिल्प, ५० सतीशिळा आणि वीरगळ, १७ शिलालेख आणि ५३ प्राचीन बारवा, एवढा ऐतिहासिक वारसा, एका अभ्यासगटाकडून संशोधित करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्याची ही ओळख सर्व जगास व्हावी या उद्देशानं हा वारसा पुस्तक स्वरुपात प्रकाशित करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितलं.

Exit mobile version