Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अंमली पदार्थ तस्करी प्रतिबंध विषयक परिषदेला केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अंमली पदार्थांची  तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरची प्रादेशिक परिषद  केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं आज होत आहे. शाह यांच्या उपस्थितीत, सर्व राज्यांच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या समन्वयानं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो द्वारे देशाच्या विविध भागांमध्ये एक लाख ४४ हजार किलोग्राम ड्रग्स नष्ट केले जातील.

अंमली पदार्थमुक्त भारत निर्माण करण्यासाठी सरकारनं अंमली पदार्थांविरुद्ध झिरो टाॅलरन्स धोरण स्वीकारलं आहे. एक जून २०२२ ते या वर्षी १५ जुलैपर्यंत, NCB आणि राज्यांच्या ANTF च्या सर्व प्रादेशिक विभागांनी एकत्रितपणे सुमारे ९ हजार ५८० कोटी रुपये किमतीचे जप्त केलेले अंमली पदार्थ नष्ट केले आहेत.

Exit mobile version