रस्त्यावरच्या विक्रेत्यांना ई-कॉमर्स साईट्स वर आणण्यासाठी सरकारचं स्विगी आणि झोमॅटोसोबतच्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): रस्त्यावरच्या विक्रेत्यांना ई-कॉमर्स साईट्स वर आणण्यासाठी सरकारने स्विगी आणि झोमॅटोसोबतच्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण केलं आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. सुमारे साडेनऊ हजार विक्रेते याधीच ई-कॉमर्स साईट्स वर सहभागी झाले आहेत. प्रधानमंत्री स्वानिधी योजनेंतर्गत 50 लाखांहून अधिक रकमेची सहा हजार तीनशे 99 कोटी रुपयांची कर्जे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहेत.