महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून टोमॅटो बाजारात आल्यानंतर टोमॅटोचे भाव आटोक्यात येतील – केंद्र सरकार
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातला टोमॅटो बाजारात आल्यानंतर टोमॅटोचे भाव आटोक्यात येतील, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री आश्विनीकुमार चौबे यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्रानं किंमत स्थैर्य निधीतून टोमॅटोची खरेदी केली आहे, असं ते म्हणाले. राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ म्हणजे एनसीसीएफ आणि राष्ट्रीय कृषी पणन महासंघ म्हणजे नाफेडकडून टोमॅटोची प्रतिकिलो सत्तर रुपयांना विक्री केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.