नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय एकतेला बाधा येईल अशा प्रकारचं जम्मू आणि काश्मीर संदर्भातलं कोणतंही वक्तव्य राजकीय पक्षाच्या नेत्यांनी करु नये, असं आवाहन उपराष्ट्रपती एम. वैकंय्या नायडू यांनी केलं आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हैदराबाद इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कलम-370 रद्द करण्यामागे जम्मू-कश्मीरच्या नागरिकांना त्यांचे अधिकार देणं आणि त्या क्षेत्राला सर्व कायद्यांचा लाभ देणं हा उद्देश आहे, असं ते म्हणाले.
याबाबत नाहक वक्तव्य करुन सीमेपलीकडून दहशतवादी कृत्य करणा-या शेजारी राष्ट्रांना प्रोत्साहन मिळतं, असंही उपराष्ट्रपतींनी सांगितलं.