Site icon साप्ताहिक एकच ध्येय

युनेस्को आशिया – पॅसिफिक पुरस्कार मुंबईतल्या १६९ वर्षे जुन्या भायखळा रेल्वे स्थानकाला जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक वारसा स्थळांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी दिला जाणारा  युनेस्को आशिया – पॅसिफिक  पुरस्कार  मुंबईतल्या १६९ वर्षे जुन्या  भायखळा रेल्वे स्थानकाला  जाहीर झाला आहे.  केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी  आज शायना एन . सी . यांची भेट घेऊन त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं या यशाबद्दल अभिनंदन केलं.

या स्थानकाच्या संवर्धनाचं काम जुलै २०१९ मध्ये हाती घेतलं गेलं आणि  मागील  वर्षी एप्रिल महिन्यात ते पूर्ण झालं. रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या  स्थानकाच्या इमारतीचं उदघाटन झालं होतं.  भायखळा रेल्वे स्थानक हे  ऐतिहासिक वारशाचं प्रतीक म्हणून  आणि त्याच बरोबर अत्याधुनिक सुविधा देणारं रेल्वेस्थानक   म्हणून  प्रसिद्ध आहे.

Exit mobile version