Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात समान नागरी कायदा लागू करणं सध्या शक्य नसल्याचं मोहन भागवत यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात समान नागरी कायदा लागू करणं सध्या शक्य नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज सांगितलं. सोलापूर इथं आज भागवत यांनी संघ स्वयंसेवकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे प्रतिपादन केलं. २०२४ च्या निवडणुकांपूर्वी केद्र सरकार समान नागरी कायदा करेल, अशी चर्चा देशभर होत आहे,. मात्र भाजपा सरकारचं राज्यसभेत बहुमत नाही. त्यामुळे २०२४ पर्यंत देशात समान नागरी कायदा लागू करणं शक्य नाही, असं ते म्हणाले. देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू होणं आवश्यक आहे. आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी समान नागरी कायदा आवश्यक आहे, असं भागवत यांनी सांगितलं.

Exit mobile version