प्राप्ती कर संकलनामध्ये वृद्धी झाल्याची अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांची माहिती
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): गेल्या काही वर्षांमध्ये प्राप्तीकराच्या दरात वाढ न करताही प्राप्तीकर संकलनामध्ये वृद्धी झाल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली मध्ये झालेल्या164 व्या प्राप्ती कर दिवस समारंभात सीतारामन बोलत होत्या. कर संकलन प्रणालीतील कार्यक्षमतेमुळे करसंकलनातील वाढीला चालना मिळाली असून भारतीय अर्थव्यवस्था अधिकाधिक सूत्रबद्ध होत असल्याचेही अर्थमंत्री यावेळी म्हणाल्या.
तंत्रज्ञानामुळे आयकर मूल्यांकनात सकारात्मक बदल घडून आल्याचे सांगत त्यांनी सीबीडीटीच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच नव्या कर प्रणालीत करदात्यांना त्यांचे वार्षिक उत्पन्न सात लाख 27 हजारांपर्यंत असल्यास कर भरावा लागणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.