नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मिझोराम इथं गेले काही दिवस सुरु असलेल्या भारत आणि जपानच्या संयुक्त लष्करी सरावाचा समारोप झाला. या वाषिक सरावाचा हा दुसरा टप्पा होता.
पहाडी आणि अतिदुर्गम भागात होणारे दहशतवादी हल्ले आणि घुसखोरीनियंत्रण यासंदर्भात दोन्ही देशांच्या जवानांना या सरावात प्रशिक्षण देण्यात आलं. या संयुक्त सरावामुळे द्विपक्षीय विश्वास आणि सामंजस्य वाढीला लागलं. तसंच संरक्षण सहकार्य वृद्धींगत झालं असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.