Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पुण्यात दक्षिण कमांडने साजरा केला 24 वा कारगिल विजय दिवस

पुणे : पुण्यातील दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे 26 जुलै 2023 रोजी आयोजित समारंभात कारगिल विजय दिवस मोठ्या अभिमानाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला पुण्यातील लष्करी जवान तसेच दक्षिण विभाग परिसरातील माजी सैनिक उपस्थित होते. या सोहळ्यात कारगिल युद्धातील शूरवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दक्षिण कमांड मुख्यालयाचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल ए. के. सिंग यांनी स्मारकात वीर जवानांना पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले. 

ऑपरेशन विजयच्या यशानंतर आजच्या दिवसाला कारगिल विजय दिवस असे नाव देण्यात आले आहे., पाकिस्तानी सैनिकांनी कडक हिवाळ्यात विश्वासघातकीपणे ताब्यात घेतलेल्या अति उंच ठिकाणच्या चौक्यांचा ताबा, भारतीय सशस्त्र दलांनी आजच्याच दिवशी यशस्वीरीत्या परत मिळवला होता. कारगिल युद्ध 60 दिवसांपेक्षा जास्त काळ लढले गेले. भारतीय सैनिकांनी असीम शौर्याचे प्रदर्शन करुन 26 जुलै 1999 रोजी या युद्धात विजय मिळवला होता.

  

हा दिवस आपल्याला जम्मू आणि काश्मीर राज्याच्या बर्फाळ प्रदेशात अति उंचीवर पाकिस्तानशी कारगिलची लढाई लढणाऱ्या आपल्या सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. त्या भव्य विजयाचा हा चोवीसावा वर्धापन दिन आहे.

Exit mobile version